Monday, 13 December 2021

मुलींच्या जळगाव येथील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

         जळगाव, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) : समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत जळगाव येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे सन २०२१-२२ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यालय विभागात एकूण २८, कनिष्ठ महाविद्यालय विभागात १२, बिगर व्यावसायिक विभागात १३, तर व्यावसायिक विभागात एकूण तीन जागा रिक्त आहेत. या वसतिगृहात आठवी, अकरावी, पदवी व अन्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून प्रवेश देण्यात येतो. अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी शासकीय मुलींचे वसतिगृह, सिंधी कॉलनी, जळगाव येथे संपर्क साधावा, असे गृहपाल, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment