Wednesday, 1 December 2021

महाआवास अभियानअंतर्गत उद्या जळगावला जिल्हास्तरीय कार्यशाळा

जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : ‘सर्वासाठी घरे’ या केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत 31 मार्च, 2022 पर्यंत राज्य  शासनामार्फत राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवार 3 डिसेबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असतील, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                          00000

No comments:

Post a Comment