जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment