Monday, 10 October 2022

२३ ऑक्टोंबर रोजी पेंशन अदालतीचे आयोजन

       जळगाव, दि.१० (जिमाका वृत्तसेवा) :-   शासनातील निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृह येथे  २३ ऑक्टोंबर  रोजी सकाळी  ११ वाजेपासून पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

          प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी), महाराष्ट्र-१, मुंबईचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृह येथे निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहतील. प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी), महाराष्ट्र-१, (मुंबई) कार्यालयाने पेंशनरांच्या सोईकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत, जसे साप्ताहिक ऑनलाईन पेंशन संवाद, २४ तास उपलब्ध टोल फ्री नं.१८००-२२-००१४ / २४*७ व्हॉईस मेल नं.०२०-७११७७७७५, माहिती वाहिनी, पेंशन  सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र पेंशनर्स करीता समर्पित ई-मेल  ‘helpdesk.mh1ae@cag.gov.in  या उपक्रमांची माहिती देण्यात येईल.

          सर्व निवृत्तीधारकांनी या अदालत मध्ये सहभागी होऊन या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment