Wednesday, 12 October 2022

यावल तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणाऱ्या जप्त वाहनांचे जाहिर लिलावाव्दारे विक्री

       जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :-    यावल तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश परीत करण्यात आलेले आहे. परंतु या वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नसल्यामुळे अशाप्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दिनांक १९ ऑक्टोंबर, २०२२ रोजी सकाळी १२ वाजता तहसिल कार्यालय यावल येथे जप्त केलेल्या चार वाहनांचे लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छूक व्यक्ती/ संस्थांनी लिलावात भाग घ्यावा, लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इ बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार यावल यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार यावल महेश पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment