Wednesday, 12 October 2022

शेतकरी बांधवांनी कांदा बियाणे खरेदी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी …कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव वैभव शिंदे

       जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :- गुणवत्ता व दर्जाचे हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडुनच खरेदीस प्राधान्य द्या, बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन पावतीसह खरेदी करा, खरेदी केलेल्या  बियाण्याचे वेष्टन, पिश्वी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची काढनी होईपर्यंत जपून ठेवावे.

          भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सिलबंद / मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतीम मुदत व लॉट क्रमांक पाहुन घ्यावा, कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारींसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा.

          आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष / दुरध्वनी/ ईमेल/ एस.एम.एस/ इ. व्दरे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव वैभव शिंदे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment