जळगाव, दि.२१ (जिमाका वृत्तसेवा) :- पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथील मंगलम सभागृह, जळगाव येथे स्टिकर चिकटविणे हा उपक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमांस मा. पोलीस अधीक्षक, डॉ. प्रविणजी मुंढे, जळगाव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, मे. पद्मसिद्धी ऑटो संचालक, संजय खैरनार, एकता रिक्षा युनियन अध्यक्ष रज्जाक खान गनी खान व पदाधिकारी, वीर सावरकर चे अध्यक्ष दिलीप सपकाळे व पदाधिकारी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहा. मोटार वाहन निरीक्षक, विशाल बटुळे, व सहकारी, कर्मचारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील सहा. मोटार वाहन निरीक्षक, ऋषिकेश महाले, मोरेश्वर साखरे, निलेश झाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपीक, श्रीमती. सुनिता मराठे यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment