Tuesday, 11 October 2022

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १४ ऑक्टोंबर रोजी आयोजन

        जळगाव, दि.११ (जिमाका वृत्तसेवा) :-     महाराष्ट्र शासनाच्या ध्येयधोरणानुसार बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी  उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव कार्यालयाच्या  वतीने दिनांक १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या  प्रमुख उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.(मुलांचे) मेस हॉल, जळगाव येथे  पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          सदर मेळाव्यासाठी एकूण  १५९८ औदयोगिक/खाजगी आस्थापनांनी १० वी पास/१२ वी पास, आय टि आय… डिप्लोमा धारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या  विविध संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

          मेळाव्यास येतांना उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रती बायोडाटा, पासपोर्ट फोटो सोबत आणावेत. ज्या उमेदवारांनी विभागाच्या वेबसाईटवर  नांव नोंदणी केलेली आहे अशा उमेदवारांना रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अप्लाय करता येईल आिा मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास हजर राहता येईल. त्याचप्रमाणे ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी त्वरीत  www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन नाव नोंदणी करुन घ्यावी.

          तरी जिल्हयातील सर्व इच्छूक उमेदवारांनी सदर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास  उपस्थित राहून शासनाद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्ह कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. वि.जा. मुकणे यांनी एक प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment