जळगाव,
दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र शासनातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृह येथे दिनांक 13 ऑक्टोंबर,
2022 रोजी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले होते.
प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी),
महाराष्ट्र-1, मुंबईचे उपमहालेखापाल (निवृत्तीवेतन) जिष्णू राजू , वरिष्ठ
लेखाधिकारी मीना कुंदनानी , सहाय्यक लेखाधिकारी पुष्पा निमजे, वरिष्ठ लेखापाल
संतोष केदारे, लेखापाल अमनदीप यांनी पेन्शनर्सच्या समस्या सोडविण्यासाठी पेन्शन
अदालत घेतली. जिल्हा कोषागार अधिकारी शरद निकुम, अप्पर कोषागार अधिकारी सुभाष गुंजाळ व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच पेन्शनर्स व पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी विविध
शासकीय कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते.
प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार कोषागार
अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी तसेच पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी एस.डब्ल्यू पाटील, सुनिल गरुड यांच्या हस्ते
करण्यात आला जिल्हा कोषागार अधिकारी यांनी पेन्शन अदालतबाबत प्रस्तावना सादर केली.
उपमहालेखापाल जिष्णू राजू यांनी
पेन्शनर्ससाठी महालेखापाल कार्यालयाने सुरु केलेल्या सुविधांबाबतचे प्रतिपादन
केले.
प्रधान महालेखाकार (मुंबई) कार्यालयाचे वरिष्ठ लेखापाल
संतोष केदारे व लेखापाल अमनदीप यांनी पेन्शन प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या
बाबींचे व्हीडीओ सादरीकरण केले. तसेच श्रीमती पुष्पा निमजे यांनी पेन्शनर्ससाठी
उपलब्ध असलेल्या सुविधा जसे साप्ताहिक ऑनलाईन पेन्शन संवाद, 24 तास उपलब्ध टोल फ्री
नं.1800-22-0014 / 24*7 व्हॉईस मेल नं.020-71177775, माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र
आणि जीपीएफ सेवापत्र, पेन्शनर्स करीता समर्पित ई-मेल ‘helpdesk.mh1ae@cag.gov.in’ या उपक्रमांची माहिती दिली.
त्यानंतर जवळपास 76 पेन्शनर्स यांच्या समस्या लेखी स्वरुपात घेण्यात येवून
त्यातील बहुतांश तक्रारींचे निवारण जागेवरच करण्यात आले तर उर्वरित
तक्रारीसंदर्भात पेन्शनर्स यांना योग्य ते
मार्गदर्शन करण्यात आले.
अजय पाटील यांनी या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर श्रीमती सोनाली घनवट यांनी आभार मानले. असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीदिलेल्या
पत्रकान्वये केले आहे.
००००
No comments:
Post a Comment