जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :- मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांचेकडून लोकशाहीचा जागर, ही स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर, २०२२ ते ३१ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
सदर
स्पर्धेची नियमावली https://forms.gle/hRoUEKUEb6T2x4g9 सर संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच स्पर्धकांनी
दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत https://forms.gle/hRoUEKUEb6T2x4g9 या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या
देखवा-सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनाही
प्रचार साहित्य मंडपामध्ये अनिवार्यपणे लावणे वंधनकारक आहे.
बक्षिसांचे स्वरुप :-
समुह लोकगीत - प्रथम क्रमांक २१०००/- २) व्दितीय
क्रमांक - ११०००/-३) तृतीय क्रमांक –
५०००/- ४) उत्तेजनार्थ – १०००/- ( एकूण दहा बक्षीसे)
एकल लोकगीत - प्रथम क्रमांक ७०००/-२) व्दितीय क्रमांक
- ५०००/- ३) तृतीय क्रमांक – ३०००/-४)
उत्तेजनार्थ – ५००/- ( एकूण दहा बक्षीसे)
तरी
जळगाव जिल्ह्यातील नागरीकांना तसेच नवरात्रोत्सव मंडळांनाही लोकशाहीचा जागर या
स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
००००००
No comments:
Post a Comment