जळगाव दि. 10 ( जिमाका ) - गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वा. ते 2.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे समवेत Aepds अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा, दुपारी 12.30 वाजता ते 2.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकारी शा.पो. आ. यांचे समवेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा, दुपारी 2.30 वा ते 4.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांचे समवेत महिला व बाल विकास सेवा योजने अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा, सायं. 6.30 वाजता शासकीय विश्राम गृहाकडे रवाना व मुक्काम, शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 वाजेपर्यंत शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुाकने, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, केंद्रीय स्वयंपाक गृहांना भेटी तसेच महिला व बालविकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी स्वस्त धान्य दुकाने व शाळांना भेटी, सायं 6.00 वाजता शासकीय विश्राम गृहाकडे रवाना व मुक्काम,
शनिवार दिनांक 14 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी
10.00 ते 6.00 वाजेपर्यंत शासकीय धान्य गोदामे, स्वस्त धान्य दुाकने, शालेय पोषण आहार
पुरवठादार गोदामे, केंद्रीय स्वयंपाक गृहांना भेटी तसेच महिला व बाल विकास सेवा योजना
पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकाने व शाळांना भेटी,
संध्याकाळी 7.00 वाजता वाहनाने जळगाव येथून मुंबईकडे
रवाना,
No comments:
Post a Comment