Sunday, 16 February 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 16 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौरा

 जळगाव दि. 16 ( जिमाका वृत्तसेवा ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 16 फेब्रुवारी 2025 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रम पुढील प्रमाणे.

   मुख्यमंत्र्यांचे आगमन दुपारी 3:45 वाजता जळगाव विमानतळावर होणार असून त्यानंतर ते शेंदुर्णी, ता. जामनेर येथे जातील. तिथे दुपारी 4:30 वाजता "दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि." संस्थेच्या अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील.

   मुख्यमंत्री संध्याकाळी 5:30 वाजता श्री. गोविंद महाराज क्रीडांगण, हिवरखेडा रोड, जामनेर येथे आगमन, सायंकाळी 6:00 वाजता जामनेर येथे "नम्मो कुस्ती महाकुंभ - 2" या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

   संध्याकाळी 7.15 वाजता जामनेर वरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण , 7.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन , रात्री 7:50 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.

                                                                    0000000000

No comments:

Post a Comment