Wednesday, 14 November 2018

चारचाकी वाहनांसाठी 21 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका


           जळगाव दि.14- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील चार चाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/सीव्ही-0001 ते 9999 पर्यंतची मालिका दि.21 नोव्हेंबर 2018 पासून सुरु करण्यात येत आहे.
             ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी दि.16 व 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा. त्यासोबत शासकीय शुल्काचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सदर मालिका चालू असतांना वाहन -4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल.
             एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत दि.19 नोव्हेंबर 2018 रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी 4 वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. असे जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment