Sunday, 18 November 2018

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


     जळगाव, दि. 19 - भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
        याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, नायब तहसीलदार लाडवंजारी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
     याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
                                                                       000

No comments:

Post a Comment