Thursday, 18 April 2019

मतदारांनी 2 तासाची मतदान टक्केवारी साठी वोटर टर्न आउट मोबाईल APP वापरावे - डॉ. अजीत थोरबोले



             जळगांव दि.18 :- रावेर लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रीयेच्या दिवशी आपल्या मतदार संघातील टक्केवारीची आकडेवारी माहीत करून घेण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये मतदारांनी वोटर टर्न आउट app डाऊनलोड करून त्याचा वापर करावा असे आवाहन सहा. निवडणूक अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
            रावेर येथे तहसील कार्यालयात रावेर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्या मतदार संघात झालेली मतदानाची टक्केवारी माहीत करून घेण्यासाठी आपल्या मोबाईलवर वोटर टर्न आउट app डाउनलोड करून घ्यावे यासाठी मोबाईल मधील प्ले स्टोरमध्ये हे उपलब्ध आहे.
            रावेर तहसील कार्यालयात सर्व निवडणुकीतील महत्वाचे अधिकारी आणि सेक्टर अधिकारी यांची बैठक घेवून त्यात प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय            प्रा. श्री. चौधरी यांनी वोटर टर्न आउट app बाबत प्रशिक्षण देतांना आपल्या कार्यक्षेत्रात झालेल्या मतदानाची आकडेवारी या app साठी कशी भरून पाठ्यावावी याची सविस्तर माहिती दिली.  यावेळी तहसीलदार अभिलाषा देवगुणे, जितेंद्र कुंवर नायब तहसीलदार संजय तायडे, कविता देशमुख यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment