जळगाव, (जिमाका) दि. 16 - राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तलयामार्फत शुक्रवार, दिनांक 18 जुन, 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत ‘चला उद्योजक होऊ या’ (उद्योजकता विकास, इनोव्हेशन व स्टार्ट-अप) या विषयावर ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आले असून या मार्गदर्शन सत्रास तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. असे डॉ. राजपाल कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन फेसबुक आणि युटयुबवर करण्यात आले असून यासंबंधीची लिंक फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युटयुब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
00000
Wednesday, 16 June 2021
चला उद्योजक होऊ या कौशल्य विकास विभागामार्फत 18 जून रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment