Wednesday, 1 June 2022

तृतीयपंथीयांसाठी एक दिवसीय विशेष शिबीर संपन्न सामाजिक न्यया विभागाच्या वतीने ऑनलाईन ओळखपत्र व योजना विषयी मागदर्शन

        जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 1 -  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने व गोदावरी टी.आय.सी.सी. यांचे सहकार्याने बुधवार दि.1 जून, 2022 रोजी सकाळी 11.00 वा. मा.आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे-1 यांच्या प्राप्त निर्देशान्वये केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून तृतीयपंथीयांना ऑनलाईन ओळखपत्र, प्रमाणपत्र व योजना विषयी मार्गदर्शनपर एकदिवशीय विशेष शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे संपन्न झाले. याप्रसंगी मंचावर सहायक आयुक्त, योगेश पाटील, समाज कल्याण, जळगाव, सहा.लेखाधिकारी श्रीमती. मनीषा पाटील, वरिष्ठ समाज कल्याण  निरीक्षक आर.डी.पवार, समाज कल्याण निरीक्षक समिर क्षत्रिय व प्रकल्प व्यवस्थापक विश्वनाथ कोळी आदी उपस्थित होते.

          सदर कार्यक्रमा प्रसंगी सहायक आयुक्त, श्री योगेश पाटील यांनी मार्गदर्शन करतांना राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांचा हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथी व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण कायदा अधिनियम 2019 पारित केला असून याबाबत सविस्तर विवेचन केले तसेच मा. जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीय समाजाच्या समस्या/तक्रारी निवारण संदर्भात जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथीयांना NATIONAL PORATAL FOR TRANGENDER PERSONS या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबतची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे याविषयी  माहिती दिली. याबाबत  तृतीयपंथीयांच्या शंका, समस्या यांचे निरासन तालुका समन्वयक किशोर माळी यांनी केले.
त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या पैकी 11 तृतीयपंथीयांचे शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी तालुका समन्वयक महेंद्र पाटील व किशोर माळी यांनी करून घेतली. सदर शिबिराचे प्रास्ताविक तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पगारे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक महेंद्र पाटील यांनी मानले, सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका समन्वयक चेतन चौधरी व शिला अडकमोल, धनराज पाटील, सागर पाटील यांनी परिश्रम घेतले.
 यावेळी कार्यशाळेच्या माद्यमातून उर्वरित जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या (https://transgender.dosje.gov.in) या वेबसाईटवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केले त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तृतीयपंथी व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड , वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल केला असेल तर शासनाचे गझेट व एफीडेव्हीट सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी तसेच अडचणी आल्यास सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क  (0257-2263328-29) करावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांचा वतीने करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment