जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :- कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दिनांक 15 व 16 डिसेंबर, 2022 असे 2 दिवसाचे ऑनलाईन् रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण पणे 9 वी पास ते पुढे किंवा 10 वी 12 वी ग्रॅज्यूएट / कॉम्प्यूटर ऑपरेटर, आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 164 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.
सदर मेळाव्यात
नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ् घ्यावा.
उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी
विभागाच्या www.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या
उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी
नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जावून नांव नोंदणी करुन
आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲपलाय करावा.
ऑनलाईन ॲप्लाय करण्यात अडचण असल्यास कार्यालयीन कमाकाजाच्या
दिवशी सकाळी 9.45 ते सध्यां 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक
0257 -2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकस रोजगार व उदयोजकता
वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000
No comments:
Post a Comment