जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : - श्री. जी.एच.रायसोनी ज्युनिअर कॉलेज जळगाव येथे मंडणगड पॅटर्न अंतर्गत मा. आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे तसेच मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 23 डिसेंबर, 2022 रोजी जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी श्री. बी.यु.खरे यांनी महाविदयालयातील 11 वी विज्ञान तसेच 12 वी विज्ञान अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबीरात 11 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 60 तसेच 12 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 55 विदर्यार्थी सदर शिबीरास उपस्थित होते. तसेच सदर शिबीरास महाविदयालयाचे प्राचार्य श्रीमती तिवारी तसेच महाविदयालयाचे लिपीक श्री सोनार उपस्थित होते. तसेच सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री सोनार यांनी केले आहे.
श्री.
धनाजी नाना ज्युनिआर कॉलेज जळगाव येथे मंडणगड पॅटने अंतर्गत श्री. बी. यु. खरे,
संशोधन अधिकारी जळगाव यांनी महाविदयालयातील 11 वी विज्ञान तसेच 12 वी विज्ञान
अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्याना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राबाबत
सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबीरात 11 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 63 तसेच
12 वी विज्ञान अभ्यासक्रमाचे 61 विदयार्थी सदर शिबीरास उपस्थित होते. तसेच सदर
शिबीरास महाविदयालयाचे प्रचार्य श्री. वाघुळदे उपस्थित होते. तसेच सदर कार्यशाळेचे
प्रास्ताविक श्रीमती प्रिती बोंडे यांनी केले.
तसेच
श्री. बी.यु. खरे संशोधन अधिकारी जळगाव यांनी वर्ग 11 वी विज्ञान अभ्यासक्रमाच्या
विदयार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरीता समितीकडे अर्ज करण्यात
यावे. असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बी. यु. खरे
यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment