जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका लोकशाही दिन घेण्याच्या शासकीय परिपत्रकानुसार जानेवारी, २०२३ या महिन्यात तिसऱ्या सोमवारी दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या तहसिल कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या
तक्रारी घेवून सदरहू तालुका लोकशाही दिनी आपल्या
संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment