जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्यात शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा शेतकऱ्यास कृषी विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते युवा शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातील शेतकऱ्यांकडून युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचे स्वरूप- रू.30000/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीत्र व सपत्नीक /
पतीसह सत्कार
देण्यात येणारे पुरस्कार
संख्या- 08 (प्रत्येक कृषी विभागातून 01 याप्रमाणे)
पुरस्कारासाठी चे निकष
1) प्रस्ताव सादर करते वेळी शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षे असावे
2) शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे
(आई वडील पती / पत्नी) शेती असावी आणि तो स्वतः
कुटुंबीयांसह शेती करणारा असावा.
3) प्रस्तावित युवा शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा
तसेच
यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत, सेंद्रिय
शेती इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा असावा.
4) प्रस्तावित शेतकरी प्रक्रिया विक्री गट, संघटन कार्य यामध्ये सक्रिय
सहभाग घेणार त्याच प्रमाणे प्रसार व समाज माध्यमांद्वारे कृषी विषयक माहिती प्रचार
व प्रसिद्धीसाठी उपयोग करणारा असावा.
1) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील
अंतर किमान तीनवर्ष असावे
2) प्रस्तावित शेतकरी केंद्र/ राज्य शासकीय / निमशासकीय किंवा शासन
अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे
नियमित मानधन
घेणारा नसावा. प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे
1) 7/12 व 8- अ चा उतारा
2) केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी
करत नसले बाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
3) मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला
4) वयाचा दाखला
5) कृषी विकास विस्तार सामूहिक कृषी पणन व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले
असल्यास
त्याबाबतचा तपशील प्रस्तावास जोडावा.
तरी वरील प्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक
माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक नाशिक श्री. मोहन वाघ, यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment