Tuesday, 6 December 2022

कात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत सामुहिक शेततळे व शेततळे अस्तरीकरण घटकांतर्गत प्लॉस्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्याच्या विक्रेता / वितरकांचे नोदणी अर्ज मागविणेबाबत

           जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत सामुहिक शेततळे व अस्तरीकरण घटकांतर्गत प्लॉस्टिक फिल्म पुरवठा करणान्या उत्पादक कंपनांच्या विक्रेता/ वितरकांची नोंदणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात इच्छुक कंपन्यांकडून अर्ज दिनांक- 2 डिसेंबर ते 15 डिसेंबर, 2022 या कालावधीत मागविण्यात येत आहेत. प्लॉस्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या वितरक/ विक्रेता यांच्या जिल्हास्तरावरील  नोंदणीच्या अटी व शर्ती खालील  प्रमाणे राहतील.

 

1) प्लॉस्टिक फिल्मचा  (रीइनफोर्सड एचडीपीई जीओ मेंबरेन फिल्म  IS:15351:2015 Type II) पुरवठा करणान्या वितरक/ विक्रेता यांची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव कार्यालयाकडे करावयाची आहे. 2)  ज्या उत्पादक कंपन्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे राज्यस्तरीय नोंदणीकरीता पात्र असतील अशा कंपन्यांचे वितरण किंवा विक्रेता जिल्हास्तरावर नोंदणीस पात्र असतील. एका वितरकास जास्तीत जास्त तीन उत्पादक कंपन्यांचे वितरक म्हणून नोंदणी करता येईल.

 

3) राज्यस्तरावर नोंदणीकृत कंपन्यांच्या अधिकृत विक्रेता/वितरकांना महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे कार्यालयाने निर्गमित केलेल्या वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामूहिक शेततळे या घटकांच्या मार्गदर्शक सूचनातील तांत्रिक निकष IS:15351-2015 Type II नुसार साहित्य पुरवठा करणे व कामे करणे बंधनकारक राहील, तसेच या कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्गमित होणारे परिपत्रक, आदेश, शुद्धीपत्रक, सुधारित सूचनांचा अवलंब  करणे अनिवार्य राहोल.

 

4) जिल्हास्तरावरील प्लॉस्टिक फिल्म पुरवठा करणान्या वितरक/ विक्रेता नोंदणी करीता अर्जदारास वितरक नोंदणी अर्ज (फोटोसह), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्या नावे रक्क्म रु.2,00,000/- ची बँकेची स्टँप पेपरवरील मुळ बँक गॅरंटी व एक झेरॉक्स प्रत, वितरकाचे रू. 100 च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीच्या अटी शर्ती बाबत करारनामा, मान्यताप्राप्त उत्पादक कंपनीचे वितरक प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त कंपनीचे राज्यस्तरीय नोंदणी प्रमाणपत्र, वितरक व उत्पादक कंपनी यांच्यातील करारनाम्याची साक्षांकित प्रत, वितरक दुकान स्थळ /जागेचा पुरावा 8अ / ग्रामपंचायत किंवा नगरपालिका मालमत्ता पत्रक, दुकान भाड्याने घेतले असल्यास भाडेकरार व जागा मालकाचे नाव असलेला जागेचा उतारा किवा ग्रामपंचायत/नगरपालिका कर भरणा पावतीची झेरॉक्स प्रत, दुकान नोंदणी प्रमाणपत्र (शॉपॲक्ट प्रमाणपत्र) पॅनकार्ड झेरॉक्स प्रत,  जी.एस.टी. प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, आधारकार्डची  झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत,  इत्यादी कागदपत्रे  सादर करावी लागतील,

5) जे नोंदणीकृत उत्पादक कंपन्या वितरक नेमणूक न करता कंपनीच्या देयकावर थेट शेतकन्यांना विक्री  व्यवहार करतील त्यांनी विभागासाठी निश्चित केलेल्या त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्राच्या ठिकाणी वितरक / विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल.

6)ज्या नोंदणीकृत उत्पादक कंपन्यांना जिल्ह्यात वितरक नेमणूक करून व्यवसाय करावयाचा आहे अशा कंपन्यामार्फत नेमलेल्या वितरकांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडे नोंदणी करावी लागेल. 7) नोंदणीकृत  वितरकाने त्यांच्या विक्री केंद्रात ठळक दिसेल अशा ठिकाणी दर्शनी भागात नोंदणी प्रमाणपत्र लावणे बधनकारक राहील. तसेच साहित्याच्या विक्री व्यवहार संदर्भात कंपनीनिहाय विहीत नमुन्यात साठा रजिस्टर ठेवणे अनिवार्य राहोल.

8) नोंदणी कालावधी दरम्यान वितरकांचे स्थळ पाहणी/ दुकान तपासणी तंत्र अधिकारी व समकक्ष अधिकारी यांनी करणे आवश्यक राहील. 9) जिल्हास्तरावरील प्लॉस्टिक फिल्म पुरवठा करणान्या वितरक विक्रेता नोंदणी बाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा 3, दुसरा मजला, आकाशवाणी चौक,  जळगाव यांच्याशी संपर्क करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment