जळगाव, दि.१२ (जिमाका वृत्तसेवा) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवहन संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/ईसी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 15 डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयात दिनांक 13 व 14 डिसेंबर, 2022 रोजी अर्ज दुपारी 4.00 वाजेपर्यंत जमा करावीत. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅकेचा (डीडी हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 13 व 14 डिसेंबर, 2022 या दोन दिवसात दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर करावी.
सदर
आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर सदर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी
करणेकामी देणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. सदर पावतीची विधीग्राह्यता ही फक्त
30 दिवस असल्याबाबतची नोंद घेण्यात यावी.
दिनांक
13 व 14 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील व दिनांक 15
रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास
खालील पध्दतीले क्रमांक जारी करण्यात येतील.
दिनांक
14 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात एका क्रमांकसाठी
एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास. एका पेक्षा जास्त अर्ज आलेल्या
क्रमांकाच्या बाबतीत दिनांक 15 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष
(डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. दिनांक 15 डिसेंबर,
2022 रोजी दुपारी 2.00 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश
सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना
परत करण्यात येतील याची सर्व संबंधित वाहनधारकांना नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment