जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा):- जिल्हयातील राज्य शासनाच्या सर्व सेवा निवृत्तवेतन धारकांना कळविण्यात येते की, माहे डिसेंबर- 2022 च्या निवृत्तीवेतनास हयातीच्या दाखल्यांचे काम चालू असल्याने , तसेच निवृत्तीवेतन शाखेतील कर्मचाऱ्यांची दिनांक 27 ते 30 डिसेंबर, 2022 या कालावधी दरम्यान 8 वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क ( भाग-1 व 2 ) विभागीय परीक्षा असल्याने 5 जानेवारी, 2023 पर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे.
तरी
आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. ज्यांनी हयातीच्या दाखल्यांच्या यादीवर
अद्यापपर्यंत स्वाक्षरी केलेली नसेल त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे
दिनांक 30 डिसेंबर, 2022 पर्यंत हयातीचे दाखले जमा करण्यात यावेत , जेणेकरुन
त्यांचे निवृत्तीवेतन बँकेत जमा करणे शक्य होईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी श.वा.
निकुम यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment