जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : -रब्बी 2022 हंगामाची पेरणी सुरु आहे. तसेच जिल्ह्यात आज रोजी युरीया या मुख्य खताचा साठा 32.382 मे. टन असुन, एसएसपी खताचा 20.320 मे. टन. एमओपी खताचा 4.052 मे. टन, डीएपी चा 6,552 मे. टन व इतर संयुक्त खते जसे 10.26.26.15.15.15,20.20.0 व 16.16.16 या खतांचा साठा 26,514 मे. टन एवढा शिल्लक आहे. शेतकऱ्यामार्फत जादा मागणी असलेल्या 10.26.26 या खताचा माहे ऑक्टोंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत 4,722 मे. टन एवढा पुरवठा झालेला आहे. तसेच पुढील आठवडयात कृभको कंपनीमार्फत 10..26.26 या खताचा 3100 मे. टन एवढा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात आजरोजी 10.26.26 या खताचा जिल्ह्यात शिल्लक साठा 1572 मे. टन असुन तालुकानिहाय व डिलरनिहाय उपलब्धतेचा अहवाल सोबत जोडुन देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्व खते उपलब्ध असुन दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यातील व तालुक्यात उपलब्ध साठसाची विक्रेतेनिहाय माहिती कृषक ॲपवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात कोणत्याही खतासोबत इतर खत घेण्याची सक्ती दुकानदारांमार्फत करण्यात येत असेल तर त्वरीत आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी .
शेतकरी
बांधवांनी फक्त विशिष्ट एकाच खताचीमागणी न करता इतर उपलब्ध सरळ मिश्र व संयुक्त
खतांचा वापर संतुलीत प्रमाणात करावा. आपण मिश्र खतांच्या ग्रेड युरीया, पोटॅश व
एस.एस.पी या खतांच्या माध्यमातुन खालील उल्लेख केल्याप्रमाणे घरच्या घरी मिश्र खते
तयार करु शकतो.
50 किलो मिश्र खताची एक गोणी
तयार करण्यासाठी लागणारी खतमात्रा ( किलोमध्ये)
मिश्र खताचे नाव – 15-15-15, युरीया
– 17, सिंगल सुपर फॉस्फेट – 47, पोटँश - 13
मिश्र खताचे नाव – 10-26-26, युरीया – 11, सिंगल सुपर फॉस्फेट – 82, पोटँश -22
मिश्र खताचे नाव – 12-32-16 युरीया – 13,
सिंगल सुपर फॉस्फेट – 100, पोटँश
-14
मिश्र खताचे नाव – डीएपी, युरीया – 20,
सिंगल सुपर फॉस्फेट – 144,
पोटँश-00
मिश्र खताचे नाव – 20-20-00 युरीया – 22,
सिंगल सुपर फॉस्फेट – 63, पोटँश
-00
मिश्र खताचे नाव – 19-19-19, युरीया – 21,
सिंगल सुपर फॉस्फेट – 60, पोटँश
-12
मिश्र खताचे नाव – 18-18-10 युरीया – 12,
सिंगल सुपर फॉस्फेट – 20, पोटँश
-09
मिश्र खताचे नाव – 24-24-00, युरीया – 38,
सिंगल सुपर फॉस्फेट – 75, पोटँश
-00
मिश्र खताचे नाव – 14-35-14, युरीया – 16,
सिंगल सुपर फॉस्फेट – 110, पोटँश
-12
काही
कृषि निविष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम खत टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री
करु नये, रा. खते विक्री करतांना इतर कृषि निविष्ठा लिंकींग विक्रेते यांनी कर नये
म्हणून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे. शेतकरी
बांधवांनी खताच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा
दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा
कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत
खरेदी करुन साठा करु ठेवू नये, सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल
करावी. खत खरेदी पक्कया बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी. शेतकरी बांधवांनी
जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी,
असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव वैभव दत्तात्रय शिंदे यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment