जळगाव, दिनांक 27 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापि, मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी 1 मे, 2023 या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार 2 मे, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालीयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन रविंद्र भारदे, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment