जळगाव, दि.6 (जिमाका वृत्तसेवा) :- एप्रिल महिन्यात राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालून दिलेला वारसा डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या समाज कल्याण विभागाने राष्ट्रपुरुष/थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन करण्याचे ठरविले आहे. त्यातंर्गत 1 एप्रिल ते 1 मे, 2023 या महिन्याभराच्या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून समाज कल्याण विभाग महिनाभर सामाजिक न्याय पर्व हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
जळगावात
सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन समाज कल्याण कार्यालय, जळगाव येथे 1 एप्रिल, 2023
रोजी सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व त्यांच्या विचारांचा जागर
करून करण्यात आले. यावेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी, जिल्हा जातपडताळणी समिती व
विविध महामंडळाचे कर्मचारी, तसेच कार्यालयातील तालुका समन्वयक उपस्थित होते.
या
कालावधीत सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती
करणे, 1 एप्रिल ते 1 मे, 2023 दरम्यान जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचे
वाटप करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करणे, राज्यातील सहायक आयुक्त, जिल्हा समाज
कल्याण अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, कार्यालय यांच्यावतीने
शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र
देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत
पोहचविणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वसतिगृहामध्ये डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारांवर आधारित वक्कृत्व
स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करणे,
तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी यांना प्रातिनिधीक
स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे, समतादुत यांच्यामार्फत ग्रामीण
व शहरी भागात पथनाट्य व लघुनाट्यव्दारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व
सामाजिक प्रबोधनार्थ कार्य करणे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक
कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व
आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय, ऊसतोड
कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांचेमार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे,
तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनर्वसन 2013 जनजागृती करणे, कर्मवीर
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थ्याची कार्यशाळा घेणे,
ऊसतोड कामगारांची नोंदणी व ओळखपत्र वाटप, तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुनरागमन शिबिर
आयोजित करणे, त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव ग्रामीण व शहरी भागातील
अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच
प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे आदि कार्यक्रम घेणार आहे.
समान
संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियानातंर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती
योजनांची माहितीबाबत जनजागृती करणे, तृतीयपंथीय व्यक्तींसाठी शिबिर आयोजित करणे व
ओळखपत्र वाटप करणे, अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे, शासकीय
वसतिगृह, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे, महाराष्ट्र दिन साजरा
करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला समता रजनी
कार्यक्रमाचे आयोजन करणे, दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक
सुरक्षा योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
सदरचे कार्यक्रम आयोजित करताना स्थानिक निवडणुका व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार
नाही याची दक्षता घेऊन करण्यात येणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
चौकट
महात्मा
ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज या महापुरुषांची जयंती एप्रिल महिन्यात आहे. या महापुरुषांनी
समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी केलेल्या समाज कल्याणाच्या कार्याची प्रेरणा
घेऊन समाज कल्याण विभागाने महिनाभर सामाजिक न्याय पर्व हा अभिनव उपक्रम
राबविण्याचे निश्चित केले आहे.
डॉ.
प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
00000
No comments:
Post a Comment