Tuesday, 2 July 2024

अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलै पर्यंत अर्ज पाठवावा

         जळगाव, दि. २ (जिमाका वृत्तसेवा) :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी १८ ते ४० वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.

            सदरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉटींग व ऑफीस ऑटोमेशन, इलेक्ट्रीसियन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.

            तरी इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि २५ जुलै, २०२४ पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलुर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावे किंवा समक्ष भेटावे असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे. शाळेचा पत्ता – भायेगाव रोड, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड  मो. न. ९९६०९००३६९, ९४०३२०७१००, ७३७८६४११३६, ९४२०८४६८८७     -    0000000000

No comments:

Post a Comment