जळगाव दि. 17 ( जिमाका ) - प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयातर्फे तालुकानिहाय वर्षभर मासिक दौरा आयोजित करण्यात येत असतो परंतु बुधवार दिनांक 18 सप्टेंबर, 2024 रोजी ई ए मिलाद निमित्त शासकीय सुट्टी जाहिर झाल्याने सावदा येथील मासिक दौरा रद्द करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मासिक दौरा शनिवार दिनांक 21 सप्टेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे यांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment