Friday, 6 September 2024

महाराष्ट्र शासनकृषी सल्ला-कृषी विभाग – विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना

         जळगाव दि. 6 ( जिमाका )  - तूर पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ % निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३०% प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी,  तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारावेत, सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत,  मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १०% पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५% एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७% एस सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५% एस जी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी,  भुईमूग पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुवेन्डामाइड ३.५% + हेक्साकोनॅझोल ५% डब्ल्यूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,  भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनिल ५ % एस.सी. २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी,  शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी T० आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. असे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000000000

No comments:

Post a Comment