Tuesday, 17 September 2024

उच्च शिक्षण विभागांमार्फत राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

         जळगाव दि. 17 ( जिमाका ) -  उच्च शिक्षण विभागांमार्फत राबविण्यात येणा-या राजर्षि शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसह सर्व शिष्यवृत्तीचे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज भरणे महाडिबीटी पोर्टलवर दिनांक 25 जुलै, 2024 पासून सुरु झालेले आहे. तरी प्रवेशित विद्यार्थी/विद्यार्थीनी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन तात्काळ भरावेत. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील भरलेले अर्ज विद्यार्थी/विद्यार्थीनी यांचे लॉगीन मधून पुन्हा अर्ज (Re-apply) करण्याची मुदत  31 मार्च, 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सन 2023-24 या  शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी पोर्टलवर लॉगीन करून अर्जाची स्थिती तपासून अर्ज Re-apply करण्याची कार्यवाही विहीत मुदतीत करावी.

            तरी जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्हयातील अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित कायम विना अनुदानीत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनीनी अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, अर्ज भरण्यास काही अडचण असल्यास संबंधित महाविद्यालयातील शिष्यवृत्ती नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहसंचालक उच्च शिक्षण जळगांव विभाग, जळगांव डॉ. रणजितसिंह निंबाळकर, यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

000000000

No comments:

Post a Comment