Tuesday, 10 September 2024

"मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर

         जळगाव दि. 10 ( जिमाका ) - राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्याना  वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यायादो आवश्यक सहाय साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच  मनः स्वास्थय केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय क्रमांक - ज्येष्ठना २०२२/प्रक्र. ३४४/सामासु मुंबई दि.०६  फेब्रुवारी, २०२४ नुसार मान्यता देण्यात आली आहे.

        योजनेचे स्वरूप  - सदर योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्याच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतनुसार सहायभूत साधने/उपकरणे खेरेदी करता येतील. (उदा-श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर. फाल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची.नि-ब्रेस. लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ.)

            योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे - आधारकार्ड/मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकचर्चा बैंक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2फोटो, दोन प्रकारचे स्वयंघोषणा पत्र (उत्पन्ना बाबत व दुबार लाभ), शासनाने ओळख पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे. 

            सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगांव जिल्हयांत ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन खालील प्रमाणे करण्यांत आलेले आहे.  तरी त्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन करण्यांत येत आहे.  दिनांक 11 ते 14 सप्टेंबर, 2024 - महापालिका व नागरी क्षेत्रासाठी,  अधिष्ठाता, शासकिय वैदयकिय महाविदयालय, जळगाव,  जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव. व त्यांचे अधिपत्याखालील सर्व शासकिय रुग्णालये, राजश्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय शाहुनगर जळगाव. ग्रामीण क्षेत्रासाठी - जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील सर्व शासकिय रुग्णालये असे मुख्यमंत्री वयोश्रीयोजना तथा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जळगाव योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment