जळगाव दि. 9 ( जिमाका ) - यावल तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करुन तहसिल कार्यालय यावल येथे लावण्यात आलेले आहेत. सदर वाहन मालक यांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणे बाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. पंरतु संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अदयाप केलेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 176 ते 184 मधिल तरतुदी नुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून त्या नुसार जप्त वाहनांचा लिलाव करून प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करणे आवश्यक असल्याने या कार्यालयाकडील नमुना क्र.३ नुसार खाली विर्नेदिष्ट केलेली जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आली आहे. अटाकावून ठेवलेल्या वाहनाचे मा. उप प्रादेशिक परीवहन अधिकारी जळगांव यांचेकडून मुल्यांकन प्राप्त झाले आहे.
Monday, 9 September 2024
अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेच्या लिलावाव्दारे विक्रीची उदघोषणा
याव्दारे
त्यांना नोटीस देण्यात येत आहे की, विक्रीकरीता या मध्ये निश्चित केलेल्या
तारखेपूर्वी देय रक्कम शासन जमा केली नाहीतर ही मालमत्ता तहसिल कार्यालय यावल येथे
दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येईल. अशा तन्हेने कोणतीही
विक्री कायम होण्यास अधीन राहील.
जप्त केलेल्या जंगम मालमत्ता धारकांचे नांव व पत्ता - वाहनाचा
प्रकार - वाहन क्रमांक/चेसीस नंबर मा.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी कळविलेले बाजारमूल्यांची रक्कम
जप्त
केलेल्या जंगम मालमत्ता धारकांचे नांव व
पत्ता – गोपाळ बापू सोळंके, कोळन्हावी, ता यावल जि. जळगाव - वाहनाचा प्रकार - टाटा इंट्रा, वाहन क्रमांक/चेसीस नंबर MH-19-CX-1135, नंबर मा.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी कळविलेले बाजारमूल्यांची रक्कम रु. 6,00,000/-
जप्त
केलेल्या जंगम मालमत्ता धारकांचे नांव व
पत्ता –श्रीराम सुरेश सोनवणे, खेडी ता. एरंडोल जि. जळगाव, ट्रॅक्टर MH-19-BG-6065, रु.2,35,000/,
गौरव सतिष सोळंके, कानळदा, पिक-अप- 407, MH-04-CP-5730, रु.2,20,000/-
अविनाश
बाविस्कर, करंज, ता. जि. जळगाव, डंपर, MH-19-Z-5912
रु.3,81,000/- विवेकानंद मधुकर पाटील, विदगाव
ता. जि. जळगाव, ट्रॅक्टर, चेसीस क्रमांक WRCE40922173438, रु. 2.30,000/- नितेश हरी कोळी, मनवेल, ता.
यावल, ट्रॅक्टर MH-37-T-1279 रु. 1,95,000/- सावराबी सैय्यद महम्मद साकळी ता यावल जि. जळगाव , डंपर MH-19-CY-3426, रु. 1,75,000/-
सदर लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या
व्यक्तीना कळविण्यात येते की त्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची हातची किमत. अनामत रक्कम तसेच
लिलावाच्या अटी व शर्ती या करीता तहसिलदार यावल यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क
साधावा,
लिलावातील
अटी व शर्ती खालील प्रमाणे
लिलावात
भाग घेण्याची निवीदा अर्जाचे शुल्क रु १,०००/- प्रत्येक वाहनांसाठी अर्जाचे शुल्क
वेगवेगळे भरावे लागेल (विना परतावा), लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीला अनामत रक्कम रु
५,०००/- रक्कम रोखीने जमा करणे आवश्यक आहे, लिलाव धारकाने सर्वोच्च बोलीने वाहन घेतल्याबरोबर
त्या सर्वोच्च बोलीची रक्कम २४ तासाच्या आत चलनाने जमा करावी लागेल, सदर वाहन लिलाव ठरवलेल्या दिवशी सकाळी ११.००
वाजता सुरू होईल, सर्वोच्च बोली बोलणाऱ्या
व्यक्तीने २४ तासाच्या आत सर्वोच्च बोलीची रक्कम चलनाने सरकार जमा न केल्यास अनामत
रक्कम रु. ५०००/- हो जप्त करण्यात येईल,
जेव्हा विक्री कायम केली जाण्यास पात्र असेल तेव्हा खरेदीदार म्हणून जाहिर करण्यात
आलेल्या लिलावधारकास त्यांने बोलो केलेल्या रक्कमेच्या २५% रक्कम ताबोडतोब भरणे
बंधनकारक असेल, बोली केलेल्या बोलीच्या
२५% रक्कम अनामत ठेवण्यास कसूर केल्यास ती
मालमत्ता ताबोडतोब विक्रीसाठी पुन्हा काढण्यात येईल व अशा कसुरदार व्यक्तीने लिलवात
घेण्यासाठी भरलेली अनामत रक्कम रु. ५०००/- सरकार जमा करण्यात येईल, लिलावात भाग घेणा-या व्यक्तीपैकी ज्या व्यक्तीची
बोली सर्वोच्च असेल त्या व्यक्तीची अनामत रक्कम लिलावाच्या सर्वाच्च बोलीच्या २५% रक्कमेमध्ये समाविष्ट करण्यात
येईल.
जप्त
केलेल्या वाहनांचे लिलावाबात उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी जळगाव यांनी निश्चित केलेली हातची किमत (Upest Prise) महणून
धरण्यात येईल व लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी सदर हातच्याकिमती पुढे बोली लावावयाची आहे, लावण्यात येणारी बोली रु. ५०००/- किया त्याचे पटीत असेल, एका लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस दुसऱ्या वाहणाच्या लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास त्याच
अनामत रक्कम या आधीच्या लिलावात सर्वोच्च बोली बोलल्याने समाविष्ट झाली असल्यास
पुन्हा रु. ५०००/- अनामत म्हणून भरावी लागेल, तहसिलदार किवा त्यांचे अनुपस्थितीत
लिलाव करणाऱ्या अधिकार-यास कोणत्याही पुरेशा कारणास्तव लिलाव वेळोवेळी तहकुब करता
येईल, परंतु ३० दिवसापेक्षा अधिक
मुदतीसाठी विक्री तहकुब करण्यात आल्यास नविन उदघोषणा करण्यात येईल, एकापेक्षा अधिक लिलाव असल्यास एका लिलावाची
प्रक्रिया झालेनंतर पुढील लिलाव सुरू करण्यात येईल, फेरलिलावा
मध्ये जास्त किमत आल्यास ती कसुर करणाऱ्या खरेदीदारास मिळणार नाही, खरेदीचे रक्कम देण्यास कसूर करण्यात आलेल्या
मालमत्तेची प्रत्येक फेर विक्री ताबडतोब करण्यात येईल, असे न केल्यास विहीत केलेल्या रितीने नविन नोटीस
दिल्यानंतर करण्यात येईल, अशा विक्री रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज मा.
जिल्हाधिकारी जळगांव यांची समंत केल्यास विक्री रद्द होईल व नविन विक्रीनुसार मा.
जिल्हाधिकारी आदेश देतील त्यानुसार कारवाई करण्यात येईल, मा. जिल्हाधिकारी स्वत
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २०६ अन्वये विक्री रदद करु शकतील, वाहनाचे लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस कसूर
करणाऱ्या व्यक्तीने विक्री योग्य हितसंबंध नव्हते या कारणास्तव विक्रीच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या मुदतीत
मा. उपविभागीय अधिकारी, फैजपुर भाग फैजपुर याचे खरेदी रद्द होणेसाठी अर्ज करता
येईल, लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीना लिलाव करण्यात येणा-या
वाहनाची ठरविण्यात ओली हातची किमत (Upe st frise) मान्य आहे व लिलावात अटी व शती
मान्य आहे असे बंधपत्र भरून दिल्यावर व
लिलावात भाग घेण्यासाठी रक्कम रु. ५०००/- भरलेनंतरच लिलावात भाग घेता येईल. प्रत्येक लिलावासाठी वेगळे बंधपत्र भरुन देने बंधनकारक आहे. तसेच रु.५०००/- ही रक्कम प्रत्येक
लिलावामध्ये जमा करणे आवश्यक आहे, लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीपैकी कोणीही
लिलावामध्ये हातची किंमतीपेक्षा जास्त बोली न बोलणाऱ्या लिलावामध्ये भाग घेणाऱ्या
सर्व व्यक्तीचे लिलावात भाग घेण्यासाठी भरलेले अनामत रक्कम ५०००/- सरकार मा
करण्यात येईल. सदर वाहनांचे लिलाव संदर्भात सर्व अधिकार तहसिलदार यावल यांचेकडेस
राखुन ठेवलेले आहे. वरील दिनांकास वरील प्रमाणे जंगम मालमत्तेचे जाहिर लिलाव
करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी संस्थांनी लिलावात भाग घ्यावा असे
आवाहन तहसीलदार यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment