मुंबई दि. 22 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी
संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील
इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम
कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन
घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व
www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहेत.
अटलबिहारी
वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय),1,00,000/- (रुपये एक लाख
रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक), बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी)
(राज्यस्तर), 51 हजार रुपये,(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार
(इंग्रजी) (राज्यस्तर), 51 हजार रुपय, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), बाबूराव विष्णू
पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर), 51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र),
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर), 51 हजार रुपये (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क)
(राज्यस्तर), 51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र),पु.ल.देशपांडे उत्कृष्ट
दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर), 51 हजार रुपये, (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र),तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार
(राज्यस्तर), 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
केकी
मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर),
51 हजार रुपये, (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर), 51
हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
(राज्यस्तर), 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) पत्रकार सुधाकर डोअीफोडे
अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर), 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), विभागीय
पुरस्कार, दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग), 51 हजार रुपये, मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.
अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग), 51 हजार रुपये (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र). आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग),51 हजार रुपये (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह
व प्रशस्तीपत्र), शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग), 51 हजार रुपये (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र),ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग) 51 हजार रुपये (मानचिन्ह व
प्रशस्तीपत्र) लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग), 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग), 51 हजार
रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
0000000
No comments:
Post a Comment