जळगाव, दि. 28 (जिमाका) - मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीन्वये दिनांक 01 जानेवारी 2024 ते 04 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्णाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी येत्या 30 जानेवारी रोजी जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, धरणगाव,
चाळीसगाव, भडगाव, पारोळा या तालुक्यात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली 30 जानेवारी
रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या सभेस सर्व
नागरिकांनी सदर सभेस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी
प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment