Sunday, 26 January 2025

जळगाव विमानतळावर ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 


            जळगाव दि.26 (जिमाका): २६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव विमानतळावर उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. विमानतळ संचालक श्री. हर्ष त्रिपाठी यांनी  राष्ट्रध्वजाला वंदन केले आणि उपस्थितांना संबोधित करताना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले.

            भारतीय विमानतळ प्राधिकरण जळगावतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला विमानतळाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रातील स्टेकहोल्डर्स उपस्थित होते.

            प्रजासत्ताक दिनाचा उत्सव केवळ देशभक्तीची भावना वाढवणारा नव्हे, तर समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विमानतळ प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.

0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment