Tuesday, 1 April 2025

जळगावात रोजगार नोंदणीसाठी विशेष मोहीम; 31 एप्रिलपर्यंत माहिती भरण्याचे आवाहन

             जळगाव, दिनांक  01 (जिमाका वृत्त ):  सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, शासनाच्या विविध विभागातील कार्यालये, महामंडळे, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी उद्योग यांच्या आस्थापनेवरील मनुष्यबळाची माहिती नोंदवण्यासाठी जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कार्यरत असणाऱ्या उद्योगांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. संदीप गायकवाड यांनी केले आहे.

             माहे 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) या विभागाच्या नमूद संकेत स्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्ते वर क्लिक करुन आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत भरावयाची आहे.

            याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र.०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशिर कारवाई होऊ शकते. असे संदिप ज्ञा. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविलेले आहे.

००००००००००००

 

No comments:

Post a Comment