Friday, 4 April 2025

भूमि अभिलेख चोपडा कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे उद्घावटन संपन्न

         जळगाव दि. 04 ( जिमाका वृत्तसेवा )- भूमि अभिलेख विभागाच्या सेवा जनतेला उपलब्ध होणेकरीता         उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या आवारात भू-प्रणाम केंद्राचे 4 एप्रिल  रोजी एम.पी. मगर, जिल्हा अधीक्षक भूमि जळगाव यांचे हस्ते उद्घा टन करून भूमि अभिलेख विभागाच्या वेगवेगळया सेवा जनतेस उपलब्ध करून देण्यात आहे.

            महा-ई-सेवा किवा सेतू सुविधा केंद्रातून महसूल विभागाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ नागरीकांना  घेता येतो. परंतु भूमि अभिलेख विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन असुनही स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात नव्हती  त्याअनुषंगाने जळगाव जिल्हयात प्रथमच उप अधीक्षक भूमि अभिलेख चोपडा कार्यालयात भू-प्रणाम केंद्र 4 एप्रिल,2025 रोजी सुरू झाले असून यात संगणकीकृत मिळकत पत्रिका, ७/१२ उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे,  फेरफार नोंदीचा उतारा आदी सुविधा मिळणार आहे. यासाठी जमीन व्यवहारासाठी नागरीकांना भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. भू-प्रणाम केंद्रात काम करणारे कर्मचारी प्रशिक्षित असणार आहेत. त्यांच्याकडुन नागरीकांना भू-प्रणाम केंद्रात अर्ज लिहण्यासाठी टेबल, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, वॉशरूम या सुविधा असणार आहेत.

भू-प्रणाम केंद्रातुन पुढील प्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत.

            संगणकीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा,  गाव नकाशे,  फेरफार नोंदीचा उतारा,  परिशिष्ट अ, ब, ची प्रत, नमुना नबंर ९ व १२ ची नोटीस, रिजेक्शन पत्र, निकाल पत्र, अर्जाची पोहच, त्रुटी पत्र, नोंदवहिचा उतारा, अपिल निर्णयाच्या प्रती, संगणकीकृत तयार होणारे अभिलेख, महत्वाचे  जुने दस्तऐवज, नकलादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एम.पी. मगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                     ००००००००००

No comments:

Post a Comment