रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी व किफायतशीर उपाय म्हणजे निंबोळी अर्क. हे किटकनाशक घरच्या घरी तयार करता येते, तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता.
निंबोळी अर्क म्हणजे काय?
कडूनिंबाच्या
पिकलेल्या फळांपासून तयार होणारा हा अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंडअळी, पाने पोखरणारी
व देठ कुरतडणारी अळी, फळमाशी, खोडकीडा इत्यादी किडींवर अत्यंत प्रभावी आहे. ५% प्रमाणात
फवारणी केल्यास हे किड नियंत्रण सुनिश्चित करता येते.
घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करण्याची
सोपी पद्धत :
१. निंबोळ्यांची
तयारी :
बांधावर
किंवा रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करा. त्यातील साल व गर
काढून फक्त बिया स्वच्छ धुवून सावलीत वाळवा. कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा.
२. निंबोळी
पावडर तयार करणे :
या
बिया खलबत्यात किंवा पल्वरायझरमध्ये बारीक करून ५ किलो पावडर तयार करा. ती ९ लिटर पाण्यात
भिजवा. दुसऱ्या भांड्यात १ लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा भिजत ठेवा.
३. अर्क
तयार करणे :
दुसऱ्या
दिवशी निंबोळी अर्क कपड्यातून गाळा. त्यात साबणाचे द्रावण मिसळा. हे मिश्रण ९० लिटर
पाण्यात मिसळून १०० लिटर फवारणीयोग्य द्रावण तयार करा.
फायदे :
प्रभावी
कीड नियंत्रण
अत्यल्प
खर्च
सहज उपलब्ध
व घरच्या घरी तयार करता येणारा उपाय
पर्यावरणपूरक
आणि निसर्गाशी सुसंगत
उत्पादन
खर्चात बचत, नफ्यात वाढ
निंबोळी
अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करावा. बाजारातील दर्जाहीन सेंद्रिय किटकनाशकांपेक्षा
घरचा अर्क अधिक प्रभावी व सुरक्षित ठरतो.
शेतकरी बंधूंनो,
स्वतःच्या
शेतात निंबोळी अर्क वापरून कीड नियंत्रण करा, पर्यावरणाचे रक्षण करा आणि शाश्वत शेतीचा
मार्ग स्वीकारा.
अधिक माहितीसाठी
संपर्क साधा :
तालुका कृषि
अधिकारी / मंडळ कृषि अधिकारी / कृषि सहाय्यक
संकलन :
जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
०००००००००
No comments:
Post a Comment