जळगाव, दि. 14 - कार्यकारी अभियंता, धुळे
पाटबंधारे विभाग, धुळे यांचे
अधिपत्याखालील धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील
मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, अधिसूचित नदी, नाले
तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या
बागाईतदारांना आवाहन करण्यात येत आहे. 1
मार्च ते 30 जुन 2018 या कालावधी करिता
उन्हाळी हंगाम 2017-18 साठी भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर
हंगामी पिकासाठी उपलब्धतेनुसार पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी
लाभ क्षेत्रातील इच्छूक शेतकऱ्यांनी पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा
उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल, 2018 पर्यंत सायंकाळी पावणे
सहा वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग,
धुळे यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment