Monday, 9 April 2018

नाट्यप्रयोग करावा तर जळगावच्या नाट्यगृहातच ! प्रत्येक नाट्य कलावंतास हेवा वाटेल असे नाट्यगृह उभे राहिले नाट्यगृहाचे काम बघून पालकमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान



            जळगाव, दि. 9 - प्रत्येक नाट्य कलावंतास हेवा वाटेल असे बंदिस्त नाट्यगृह जळगाव शहरात उभे राहिले आहे. हे नाट्यगृह बघून प्रत्येक नाट्य कलावंतास आपला नाट्यप्रयोग एकदा तरी जळगावच्या नाट्यगृहात सादर झाला पाहिजे असे मनोमन वाटेल असे भव्यदिव्य बंदिस्त नाट्यगृह सर्व आधुनिक सोयींसह उभारले गेले आहे. या नाट्यगृहाचा महाराष्ट्रातील सर्वात भव्य नाट्यगृह असा नावलैकीक भविष्यात होईल, असे भावपूर्ण उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज काढले. या नाट्यगृहाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री महोदयांना लवकरच निमंत्रीत करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.
            आज सायंकाळी पालकमंत्री ना. पाटील यांनी महाबळ परिसरात बांधण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहास भेट देवून तेथील कामाची पाहणी केली. नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेले अभियंते व कंत्राटदराचे ना. पाटील यांनी उत्कृष्ट कामाबद्दल अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, भरत अमळकर, सिनेट सदस्य दिलीप पाटील स्थानिक नगर सेविका यांचेसह मान्यवर उपस्थित होते.    
000

No comments:

Post a Comment