Saturday, 1 December 2018

जागतिक अपंग दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन


        जळगाव, दि. 1 - जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन मा. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सोमवार, दिनांक ३ डिसेंबर, २०१८ रोजी जिल्हाभरात दिव्यांग मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. प्रमोद भामरे यांनी दिली आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाने सुलभ निवडणूका हे घोषवाक्य जाहिर करुन निवडणूक कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा. यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, त्यास अनुसरुन जिल्ह्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात व जिल्हास्तरावर दिव्यांग मतदार दिवसाचे आयोजन केले जाणार आहे.
            जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन सभागृहात सोमवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.00 वाजता. जिल्हाधिकारी  किशोर राजे निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजी दिवेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, मनोबल संस्थेच्या श्रीमती. निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. यात दिव्यांग मतदारांना मतदार ओळखपत्र तसेच बिल्ल्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्रामार्फत ४० दिव्यांगांना मदत साहित्याचे वाटप केले जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम दिव्यांग व्यक्ती संचलीत करणार आहेत हे कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहे. या कार्यक्रमा नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. प्रमोद भामरे यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment