जळगाव,
दि. १५ -
जिल्ह्यासाठी अंत्योदय अन्न योजनेच्या १ लाख ३७ हजार ७४९ कार्डधारक
लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिन्याचा गहू, ज्वारी, मका आणि तांदूळ या
धान्याचा साठा उपलब्ध झाला आहे. या योजनेतंर्गत गहू एकूण १३ किलो प्रमाणे १७ हजार ९०७ क्विंटल, प्रति २ रुपये किलो
दराने, ज्वारी एकूण २ किलो प्रमाणे २७ हजार ५३ क्विंटल, प्रति १ रुपये किलो
दराने, मका ३ किलो प्रमाणे ४ हजार १३० क्विंटल, प्रति १ रुपया किलो दराने
असे एकूण १८ किलो प्रमाणे २४ हजार ७९० क्विंटल व तांदूळ एकुण १७ किलो प्रमाणे २३ हजार
४१० क्विंटल प्रति ३ रुपये किलो दराने धान्य
उपलब्ध आहे.
पात्र लाभार्थी कार्डधारकांनी आपल्या
जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment