जळगाव.दि 07:- साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ सठे विकास महामंडळास शासनाकडून विशेष केंद्रीय अर्थसहाय्य उपयोगिता
मार्गदर्शन तत्वानुसार एकूण प्राप्त निधीअंतर्गत निधी वापरण्याचे आदेश प्राप्त
झालेले असून इच्छूक लाभार्थ्यांनी 8 दिवसांच्या आत आपले अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जळगाव या कार्यालयात सादर करावीत.
योजना व प्रशिक्षण माहिती पुढीलप्रमाणे.. उत्पनाशी
संबंधित योजना 1) शेती व्यवसाय 2) बागकाम 3) किरकोळ सिंचन 4) मत्सव्यवसाय 5) अन्न
प्रक्रिया 6) प्रशिक्षण 7) हस्तशिल्प हातमाग 8) उद्योग सेवा आणि व्यवसाय (आयएसबी) 9)
सहकारी संस्था 10) सहकारी संस्थेचे व्यवस्थापन व सहकारी समित्यांच्या सदस्यांना
प्रशिक्षण.
प्रशिक्षण:-
1) शेती विषयक 2) फळ भाजी उत्पादन विषयक 3) पशुसंवर्धन 4) मत्स्यव्यवसाय विषयक
5) अन्न पदार्थांवरील प्रक्रीया 6) हस्तकला/हातमाग 7) उद्योग सेवा आणि व्यवसाय
(आयएसबी) 8 इतर प्रकणांसाठी अर्ज
करितांना जातीचा दाखला,रेशन कार्ड ,
उत्पन्नाचा दाखला,पॅन कार्ड ,आधार कार्ड मतदान कार्ड 2 पासपोर्ट साईजचे फोटो हे
कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. तरी इच्छूक लाभार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत व योग्य
त्या कागदपत्रांसह सादर करावीत असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment