जळगाव.दि.02
(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेंतर्गत 03 जून 2020 रोजी सकाळी 10.00
वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन
करण्यात आलेले आहे. सदर बैठकीस निमंत्रितांनी परिपूर्ण माहितीसह उपस्थित राहावे.
राज्याचे
पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली 03 जून रोजीची आयोजित 4.00 वाजेची बैठक रद्द करण्यात आलेली आहे. याची
सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment