जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाची प्रथम फेरी पुर्ण झालेली आहे. अनेक उमेदवारांनी फॉर्म भरतांना चुका केलेल्या आहेत. उदा. शहरी उमेदवारांनी ग्रामीण दर्शविलेले आहे, इंटरमिजीएट परिक्षा नसतांनाही दर्शवीली आहे, एनसीसी/स्काऊत प्रमाणपत्र नसतांनाही दर्शवीले आहे, खेळाचे गुणासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, अपंग उमेदवारासाठी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वरील उमेदवारांना अधिकचे गुणशिक्य मिळाले आहे. मात्र योग्य प्रमाणपत्र अथवा चुकीचे शहरी/ग्रामीणमुळे त्यांना प्रवेशास मुकावे लागले आहे. त्यासाठी त्यांना फॉर्ममधील चुका दुरुस्ती करणे व पुढील फेऱ्यांसाठी विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी दिनांक 20 सप्टेंबर, 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. असे ए. आर. चौधरी, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
0
People Reached
0
Engagements
No comments:
Post a Comment