जळगाव, (जिमाका) दि. 1 – मुक्ताईनगर-ब-हाणपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एल वर किमी 72/895 मध्ये जुना कमकुवत पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आलेला आहे. सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 मीटर लांबीपेक्षा मोठा गाळा असलेल्या नवीन पुलाची भारवाहक क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. सदरची तपासणी करण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. ही चाचणी दि. 2 ते 6 सप्टेंबर, 2020 मध्ये करण्याचे नियोजित आहे. या काळात पुलावरुन कोणहीही वाहतूक सोडता येत नसल्याने या कालावधीत पुलावरुन वाहतूक बंद केली जाणार आहे.
ही वाहतूक या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एल च्या किमी 70/250 वरुन नायगावकडे बेलासवाडी/रावेर फाटा राज्य मार्ग क्र.47 वरुन पुढे कोठा, कर्की ते कर्कीफाटा या प्रजिमा क्र.20 वरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एल वरील किमी 73/200 पर्यंत अशी वळविण्यात येईल. असे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, शिबीर कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment