जळगाव, (जिमाका) दि. 1 - राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये गायी/ म्हशींमध्ये लाळखुरकत (एफ.एम.डी) लसीकरण मोहिम दिनांक 1 ते 30 सप्टेंबर, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
लसीकरण करण्यात येणा-या प्रत्येक जनावरास आधारकार्ड प्रमाणे नंबर असलेला ओळख बिल्ला (टॅग) टोचणे आवश्यक आहे. सदर टॅग ची नोंद राष्ट्रीय दुग्धविकास बोर्ड यांच्या संगणकीय प्रणालीवर घेण्यात येणार असल्याने पशुपालकांनी लसीकरण करणा-या कर्मचा-यांना आवश्यक माहिती देवून सहकार्य करावे.
सर्व पशुपालकांनी आपल्याकडील गायी/म्हशींना लाळखुरकत (एफ.एम.डी) लसीकरण करणेसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000
No comments:
Post a Comment