जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, 2020 (MHT-CET) परीक्षेस ऑनलाईन पध्दतीने 1 ऑक्टोबर, 2020 पासून जळगाव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या परिक्षा केंद्राचे ठिकाणी तसेच दिनांक 11 ऑक्टोबर, 2020 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यात 20 ऑक्टोबर , 2020 पर्यंत जिल्हादंडाधिकारी, जळगाव अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) लागू केले असून प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.
दि. 1 ते 9 ऑक्टोबर, 2020 व दिनांक 12 ते 20 आक्टोंबर, 2020 पर्यंत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी तसेच दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही. तसेच परिक्षा केंद्रा जवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन/ एस.टी.डी/ आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावेत. असे जिल्हादंडाधिकारी जळगाव श्री. अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment