Wednesday, 14 October 2020

निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) -  किडनाशक उर्वरीत अंश व किड रोगांची हमी देण्‍याकरीता ग्रेपनेटव्‍दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्‍यात येते. सन 2019-20 मध्‍ये 33 हजार 451 निर्यातक्षम बागांची नोंदणी झालेली आहे. सन 2020-21 करीता निर्यातक्षम द्राक्ष बागाची युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्‍यात आलेली आहे.

      यासाठी  त्‍यातील  सुचनेनुसार आवश्‍यक असलेले अनेक्‍झर-5 (केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांकरीता कायदेशीर प्रमाणीत केलेल्‍या औंषधांची यादी.) व अनेक्‍झर-9 (द्राक्ष पिकाकरीता सन 2020-21 या हंगामाकरीता वापरण्‍याच्‍या कृषि औषधांची यादी) अंतिम करुन ग्रेपनेट प्रणालीवर प्रसिध्‍द करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागा नोंदणीकरीता ग्रेपनेट ही ऑनलाईन प्रणाली 8 ऑक्‍टोंबर, 2020 पासून कार्यान्वित करण्‍यात आलेली आहे.

     तरी सर्व द्राक्ष बागायतदारांना सन 2020-21 करीता नोंदणी/नुतनीकरण करीता कृषि विभागाच्‍या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी  व तालुका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क साधून त्‍वरीत अर्ज करण्‍यात यावेत. निर्यातक्षम द्राक्षबागाचे नुतनीकरणासाठी फक्‍त अर्ज करण्याची गरज आहे. तर नव्‍याने नोंदणीसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा व 50 रुपये नोंदणी फी आवश्‍यक आहे. ग्रेपनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची अंतिम मुदत 29 नोव्‍हेंबर, 2020 आहे.

       निर्यातक्षम बागांची वेळेत नोंदणी करणेकरीता कृषि विभागाच्‍या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी/नुतनीकरण करण्‍याचे आवाहन संचालक, फलोत्‍पादन यांनी केल्याचे कृषि संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment